शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून मान्सूनचे वेध लागले असून, मान्सून (Monsoon) आता केरळमध्ये दाखल झालेला आहे. मात्र मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात कधी होणार ? सध्या सगळ्यांना हा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरीतर पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. कारण मागील काही दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची (farmer) पिके वाया जात आहेत. मात्र अश्यातच हवामान विभागाकडून (Department of Meteorology) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
