देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेहमीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाढती महागाई, वेळी- यावेळी पडणारा पाऊस, हवामानाचा लहरीपणा अशा अनेक संकटांनी शेतकरी नेहमी घेरलेला पाहायला मिळतो. महत्वाचं म्हणजे सर्वच आदी-अडचणींवर मात करत शेतकरी पीक पिकवतो, मात्र त्याला मनाप्रमाणे हमीभाव मिळत नाही.
