गायीच्या दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपये करण्यासाठी राज्य शासनाने आदेश जारी केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता वाटत नाही, असे डेअरी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे असून, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्या मते ‘‘गायीच्या दुधाचा खरेदीदर हा प्रतिलिटर ३५ रुपये करण्याची सूचना शासनाने एक बैठक घेऊन केलेली होती. मात्र, बाजारपेठेमध्ये तशी परिस्थिती नसल्याचे आम्ही स्पष्ट केलेले आहे.
